मावळ भाजप च्या सेवा सप्ताहअंतर्गत आज गांधी जयंती निमित्त आरोग्य उपक्रमांचे आयोजन…

0
52
(मावळ प्रतिनिधी )
वडगाव : पंतप्रधान मा.श्री. नरेंद्रजी मोदी यांचा वाढदिवस, जनसंघाचे दिवंगत जेष्ठ नेते स्व.दिनदयाळ उपाध्याय आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 151 व्या जयंती निमित्त मावळ तालुका भाजपाच्या वतीने दि.१७ सप्टेंबर ते ०२ ऑक्टोबर दरम्यान सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. त्यादरम्यान वडेश्वर येथे भैरवनाथ मंदिर प्रांगणात रक्तदान शिबीर घेण्यात आले. रक्तदान करण्यासाठी यात अनेक तरुणांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला तसेच जिल्हा परिषद शाळेच्या आवारात वृक्षारोपण करून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

यावेळी मावळ पंचायत समितीचे माजी सभापती गुलाबराव म्हाळस्कर, उपसभापती दत्तात्रय शेवाळे, मा.उपसभापती शांताराम कदम, जि.प.सदस्य नितीन मराठे, भाजपाचे सरचिटणीस सुनील चव्हाण, देवा गायकवाड ,विदयार्थी आघाडी अध्यक्ष अभिमन्यू शिंदे, क्रीडा आघाडी अध्यक्ष नामदेव वारिंगे, भाजपा धनगर समाज परिषद अध्यक्ष नामदेव शेडगे,आंदर मावळ भाजपचे अध्यक्ष गणेश कल्हाटकर, भाजपा इंदोरी गण अध्यक्ष संजय पवार, देवाभाऊ गायकवाड या मान्यवरांसह भैरवनाथ लष्करी, कैलास दरेकर, मा.उपसरपंच सोमनाथ शिंदे, तुकाराम शिंदे, विठ्ठल तुर्डे, संतोष असवले, सिद्धेश लोंढे, प्रणव टेमगिरे, अनिकेत काटकर, सदानंद खांडभोर, किरण खांडभोर, सुरेश लष्करी, सागर दरेकर, अरुण मोरमारे, अर्जुन चिमटे, मनोज लष्करी, लहू लष्करी, मारुती जगताप आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
मागील १५ दिवस मावळ तालुका भाजपाच्या वतीने वरील उपक्रमांसोबतच आत्त्मनिर्भर भारत संकल्पना प्रचार, प्रधानमंत्री जीवनकार्य प्रदर्शन, प्लाझ्मा दान, लोकल फॉर व्होकल संवाद, दिव्यांग सहायता शिबीर आणि अंत्योदय संकल्पनेचे प्रणेते स्व.दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती सर्वत्र साजरी करणे आदी उपक्रम राबवून सेवा सप्ताह साजरा करण्यात आला.