![]()
if(isset($image4)); {?>
![]()
} ?>
if(!empty($image5)); {?>
![]()
} ?>
वाकसई (प्रतिनिधी): योगासन स्पर्धेत सातारा जिल्ह्यात मावळचे नाव उंचवणारे वाकसई मावळ येथील देवीक महादेव भवर आणि लक्ष महादेव भवर यांचा वाकसई चाळ संत तुकाराम नगर च्या वतीने IPS सत्यसाई कार्तिक यांच्या हस्ते सत्कार व गौरव करण्यात आला.
संत तुकाराम नगर वाकसई चाळ येथे दि.29 रोजी सायंकाळी 8 वा. हा सत्कार समारंभ संपन्न झाला. यावेळी लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी सहाय्यक पोलीस अधीक्षक IPS सत्यसाई कार्तिक हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ग्रामस्थांच्या वतीने प्रथम IPS कार्तिक यांना पुष्प गुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. तर IPS कार्तिक यांच्या शुभहस्ते सत्कारमूर्ती कुमार देवीक भवर आणि लक्ष भवर यांना पुष्प गुच्छ देऊन त्यांचा यथोचित सत्कार करून गौरविण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना विध्यार्थ्यांनी अभ्यासाप्रमाणे मैदानी खेळ जोपासले पाहिजेत, मैदानी खेळातून बुद्धी व शरीर बळकट व निरोगी राहत असते त्यामुळे शैक्षणिक अभ्यासात याचा नेहमी फायदाच होतो.
मुलांनी मैदानी खेळ खेळण्यासाठी पालकांनी त्यांना प्रोत्साहित केले पाहिजे. आज विध्यार्थी वर्ग मोबाईल मध्ये गुंतलेला दिसत आहे आणि त्यामुळे मैदानी खेळांप्रतिची आपुलकी विध्यार्थ्यांमधून कमी होताना दिसत आहे पालकांनी आपल्या मुलांना खेळासाठी प्रोत्साहन द्यावे तसेच खेळाच्या बाबतीत मुलांप्रमाणे मुलींनाही प्रोत्साहन द्यावे त्याचबरोबर मलाही खेळामध्ये खूप आवड असल्याचे सांगत IPS कार्तिक यांनी मार्गदर्शन करत देवीक आणि लक्ष यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
देवीक व लक्ष हे दोन्ही बंधू मंगल्य शिक्षण प्रसारक संस्था पुणे संचलित मागासवर्गीय मुलांचे वस्तीगृह शाखा 2 च्या समता माध्यमिक आश्रम शाळा व कनिष्ठ महाविद्यालय येथे शिक्षण घेत आहेत. शिक्षण घेत असताना अगदी लहान पाणापासून तेथील क्रीडा शिक्षक मुकेश वाघमारे व मुख्याध्यापक आणि शिक्षक वर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथम शालेय नंतर खंडाळा तालुकास्तरीय योग स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावत जिल्हास्तरीय स्पर्धेत भरारी घेतली, जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावत विभागीय स्पर्धेत त्यांची वर्णी झाली आणि त्याही विभागीय स्पर्धेत सुद्धा या दोन्ही बंधूंनी आपली कला कौशल्य दाखवून प्रथम पारितोषिक मिळवून सातारा जिल्ह्यात मावळचे नाव उंचावल्याचा अभिमान म्हणून संत तुकाराम नगर व वाकसई ग्रामस्थ्यांच्या वतीने देवीक भवर आणि लक्ष भवर या दोघांचा सत्कार समारंभ आयोजित केला.
यावेळी कार्यक्रमाच्या मुख्यस्थानी IPS सत्यसाई कार्तिक हे होते तर यावेळी वाकसई ग्रामपंचायत सरपंच दिपक काशीकर,उपसरपंच कैलास काशीकर,मारुती भरत येवले, मनोज जगताप,अमोल केदारी,प्रवीण देशमुख,गणेश देशमुख,प्रकाश बरे, उत्तम खुटवड, शिवाजी परडे, गोविंद ढाकोळ ,मोहन शिंगाडे ,माने मामा ,अशोक ढाकोळ , हरिष जानिरे ,कृष्णा चांदेकर ,कैलास भाकरे ,कैलास आडकर ,भगवान काझिक ,रामभाऊ टकले, भिमा बरबडे, केतन चिकणे आदी स्थानिक व महिला भगिनी आणि लहान मुले मोठया संख्येने उपस्थित होते.