Wednesday, May 29, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडमावळ मध्ये अनेक प्रश्न प्रलंबित , १० , वर्षे खासदारांनी कुठलीच कामे...

मावळ मध्ये अनेक प्रश्न प्रलंबित , १० , वर्षे खासदारांनी कुठलीच कामे केली नाहीं , शिवाजीराव जाधव यांचा आरोप…

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) मावळ लोकसभा मतदार संघात एस सी , एस टी , ओ बी सी , भटके , विमुक्त , आदिवासी , कष्टकरी यांच्या मूलभूत समस्या रस्ते – वीज – पाणी – घरे – शिक्षण – आरोग्य – रोजगार अशी अनेक कामे प्रलंबित असून १० वर्षे खासदार म्हणून राहिलेले येथील राज्यकर्त्यांनी कुठलीच कामे केली नसल्याचा आरोप ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक चे मावळ लोकसभेचे अधिकृत उमेदवार शिवाजीराव जाधव यांनी केला असून स्वातंत्र्याची ७५ वर्षे पूर्ण होवूनही नागरिकांच्या मूलभूत गरजा हे निवडून गेलेले खासदार पूर्ण करू शकत नसल्याने हि खूपच लाजिरवाणी गोष्ट असून आपल्या समस्या सोडविण्यासाठी स्वातंत्र्यवीर सुभाषबाबूंची ” ऊर्जा ” घेवून त्यांचा लाल बावटा व निवडणूक चिन्ह सिंह घेवून मी आपल्या मावळ लोकसभा मतदार संघातून निवडणुकीस सामोरा जात असून मला प्रचंड बहुमताने निवडून द्या , असे मतदारांना आवाहन शिवाजीराव जाधव यांनी केले आहे.

आज त्यांनी कर्जत तालुक्यात प्रचार दौरा केला असता त्यांना प्रचंड प्रतिसाद लाभला . भारत राष्ट्र समिती , शेकाप , क्षत्रिय मराठा फाऊंडेशन , मावळा युवा महासंघ , क्रांती सूर्य सोशल फाउंडेशन , महाराष्ट्र सावकारग्रस्त शेतकरी समिती या पक्ष व संघटनांचा पाठींबा घेवून शिवाजीराव किसन जाधव मतदारांना सामोरे जात आहेत . मतदारांच्या स्थानिक समस्या ते सोडविणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.
त्यापुढील प्रमाणे आहेत -१) अनधिकृत रहिवासी इमारती नियमीतीकरण व अधिकृत करणेसाठी कटिबद्ध . २) सावकारग्रस्त शेतकरी व नागरीकांना, तसेच फायनान्स कंपन्यांनी ग्रस्त जनतेला या जाचातून मुक्त करणेसाठी वचनबद्ध ३) सांडपाणी व कचरा व्यवस्थापन सक्षम करणे आणि पाणीपुरवठा सुरळीत होणेसाठी केंद्र शासनामार्फत प्रयत्न करणार. नदी स्वच्छता अभियान राबवणार .
४) औद्योगिक प्रकल्प आणि विकास योजना कार्यान्वित करणे आणि नवीन योजना राबविणार . ५) शिक्षण व आरोग्य कमी खर्चात होणेबाबत धोरणात्मक पाठपुरावा केंद्र शासनाकडे करणार . ६) नवीन मुंबई सेतू चे नाव बदलून ” सरखेल कान्होजी आंग्रे सेतु केले जाईल. ७) नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील अन्तरराष्ट्रीय विमानतळ नाव देऊ.

८) विमानतळाच्या अधिग्रहित जागेच्या मालकांना पूर्ण मोबदला मिळून देणार . ९) प्रत्येक ग्राम पंचायत मध्ये सार्वजनिक वापराची वीज मोफत देऊ . १०) प्रत्येक भगिनींच्या डोक्यावरील हंडा उतरवू. घर तिथे नळ योजना प्रत्यक्षात आणू . ११) MIDC चे प्रश्न मार्गी लावू. जास्तीत जास्त मोठ्या कंपन्या आणत असतानाच स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार उपलब्ध करून देऊ . १२) पर्यावरण पूरक उपक्रम, योजनांसाठी प्रयत्नशील राहणार. १३) शेतकऱ्यांच्या जमीनी अधिग्रहित करून लादले जाणारे प्रकल्प रोखणार , पाण्यावरील शेतकऱ्यांचा अग्रहक्क सुनिश्चित करण्यासाठी काम करणार .असे आश्वासन त्यांनी दिले आहे.

त्याचप्रमाणे महागाई रोखू , केंद्र सरकारच्या अधिकारात असलेली रिक्त पदे तातडीने भरू , महिलांची सुरक्षितता , बेरोजगार , अशी अनेक देशव्यापी समस्या सोडवू असे आवाहन ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाचे अधिकृत उमेदवार शिवाजीराव जाधव यांनी करून आपले बहुमूल्य मत ” सिंह ” या निशाणी वर देवून आपली सेवा करण्यासाठी मला प्रचंड बहुमताने निवडून द्या , असे भावनिक आवाहन उमेदवार शिवाजीराव जाधव यांनी मावळच्या मतदार बंधू भगिनी यांना केले आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page