Saturday, December 21, 2024
Homeमहाराष्ट्र"मा.आमदार संजयमामा शिंदे यांच्या प्रयत्नातून करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयात प्लॅन सिझर ची...

“मा.आमदार संजयमामा शिंदे यांच्या प्रयत्नातून करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयात प्लॅन सिझर ची सुविधा”

(सोलापुर) करमाळा – माढा मतदारसंघाचे विकासप्रिय आमदार मा.संजयमामा विठ्ठलराव शिंदे यांच्या प्रयत्नातून आणि शासन दरबारी केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयात प्लॅन सीझरची सुविधा उपलब्ध झाली आहे.

२३जुन २०२० पासून या सेवेचा प्रारंभ करण्यात आलेला असून आतापर्यंत एकूण १३ महिलांचे सीझर व्यवस्थितपणे पार पडलेले आहे.
उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल डुकरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली व स्त्रीरोग तज्ञ डॉ. निलेश मोटे , डॉ. आफ्रीन बागवान, डॉ. कविता कांबळे , डॉ. विशाल शेटे तसेच भूलतज्ञ डॉ. सत्यनारायण गायकवाड या तज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत या शस्त्रक्रिया पार पडत आहेत .

तालुक्यातील गोरगरीब जनतेने या मोफत सीझर सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन आ. संजयमामा शिंदे यांच्या वतीने करण्यात येत आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क…डॉ. राहुल कोळेकर -( वैद्यकीय अधिकारी) मो. नं. -९९७०७६७१५५.आ. संजयमामा शिंदे संपर्क कार्यालय , करमाळा – डॉ. विकास वीरमो .नंबर – ९९२२८१६६५५/७७७४०३४५५५

- Advertisment -

You cannot copy content of this page