Wednesday, September 27, 2023
Homeपुणेवडगावमित्राचा गळा चिरून खून करणाऱ्या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेने वडगाव मावळ येथून...

मित्राचा गळा चिरून खून करणाऱ्या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेने वडगाव मावळ येथून केले जेरबंद..

वडगाव दि.13: खेड पोलीस स्टेशन हद्दीत मित्राबरोबर झालेल्या किरकोळ वादातून मित्राचा धारदार शस्त्राने गळा चिरून खून केलेल्या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 24 तासातच वडगाव मावळ येथून अटक केली आहे.
रफीक उस्मान मुलाणी ( वय 35, रा. अहिरे, ता. खेड, जि. पुणे ) असे अटक केलेल्या आरोपीची माहिती असून त्यासंदर्भात चंद्रकांत सुदाम शिवले ( रा. किवळे, ता. खेड, जि. पुणे ) यांनी खेड पोलीस स्टेशनला फिर्याद दिली होती . सदर फिर्यादेवरून खेड पोलीस स्टेशन मध्ये दि.11/09/2021 रोजी गु. र. नं.540/2021, भा. द. वी. कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.


स्थानिक गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार दि.11/09/2021 रोजी दुपारी 4:30 वा. च्या सुमारास फिर्यादी सुदाम शिवले आणि त्याचे मित्र रमजान शेख व रफीक शेख हे तिघे दुचाकी वरून ट्रिपलसीट पाईट ते शिरोली रस्त्याने जात असताना रमजान शेख व रफीक शेख यांच्यात हॉटेलमध्ये झालेल्या किरकोळ वादातून रफिक याने रमजान याच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून खून केला असल्याची फिर्याद चंद्रकांत सुदाम शिवले यांनी खेड पोलीस स्टेशनमध्ये दिली असता.

सदरचा गुन्हा हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा असल्याने गुन्हा उघडकीस आणून आरोपीस तत्काळ अटक करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दिल्या होत्या त्यानुसार गुन्ह्याचा तपास सुरु असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला फरार आरोपी रफीक मुलाणी हा वडगाव मावळ येथे येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळताच वडगाव फाट्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा लावला असता एक संशयीत इसम फिरताना आढळला त्यास ताबडतोब ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याचे नाव रफीक उस्मान इराणी असल्याचे त्याने सांगितले त्याच्या कडे अधिक तपास केल्यास सदरचा गुन्हा त्यानेच केला असल्याची कबुली त्याने दिली आहे.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी खेड पोलीस स्टेशनच्या स्वाधीन केले आहे.
पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी लंभाते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अशोक शेळके, स. पो. नि. नेताजी गंधारे, स. पो. ई. रामेश्वर धोंगडे, सहाय्यक फोजदार प्रकाश वाघमारे, पोलीस हवालदार सूर्यकांत वाणी, विक्रम तापकीर, दिपक साबळे, पोलीस नाईक योगेश नागरगोजे, संदीप वारे, कॉन्स्टेबल अक्षय नवले, कॉन्स्टेबल निलेश सुपेकर यांच्या पथकाने फक्त 24 तासातच आरोपीला जेरबंद केले आहे.

- Advertisment -