Saturday, July 27, 2024
Homeपुणेलोणावळा"मिरा महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था लोणावळा" आयोजित सेवा सप्ताह संपन्न.......

“मिरा महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था लोणावळा” आयोजित सेवा सप्ताह संपन्न…….

लोणावळा : माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमे अंतर्गत आत्मनिर्भर भारत व आत्मनिर्भर ग्राम अभियान प्रेरित ” मिरा महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था लोणावळाचा ” उपक्रम दि. 25 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या कालावधीत सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.

आयोजित सेवा सप्ताहदरम्यान लोणावळा परिसरातील अनेक ठिकाणी वृक्षरोपन करत ” झाडे लावा झाडे जगवा ” हा उपक्रम राबविण्यात आला. सध्यस्थित कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता गरजूंना फेस मास्क, सॅनिटायझर, काडा व अन्न धान्य किटचे वाटप करण्यात आले.
परिसरातील आदिवासी तसेच खंडाळा येथील डोंगर माथ्यावर राहणारे ठाकर कुटुंबांची जीवन हलाखीचे असून सर्व शासकीय सुविधांपासून वंचित,हातावर पोट असलेल्या, ज्यांना रोज कमवायचे तर खायला एकवेळचे अन्न उपलब्ध होणार अशा परिस्थितीत या ठाकरवस्तीतील लोकांना एक हात मदतीचा म्हणून मिरा महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या पदाधिकारी व सदस्यांनी सेवा सप्ताह दरम्यान लोणावळा भाजी मार्केट येथे रस्त्यावर व्यवसाय करणारे ठाकर, गुरव वस्ती कुसगाव येथील गरजू व आदिवासी तसेच खंडाळा ठाकर वस्तीतील कुटुंबांना 1000 फेस मास्क, 100 काडा, 400 बॉटल सॅनिटायझर, अन्न धान्य किट तसेच लहान मुलांना कपडे व खाऊचे वाटप करण्यात आले.
त्यावेळी मिरा महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा रेश्मा शेख, उपाध्यक्षा वंदना जाधव, सदस्य आरती ठुले, शालन सासूलकर, सफिया कुरेशी, सिराज शेख इत्यादीच्या उपस्थितीत हा सेवा सप्ताह पाच दिवस राबविण्यात आला.
- Advertisment -

You cannot copy content of this page