लोणावळा दि.16: लोणावळ्यातील मीरा महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा प्रशस्तीपत्रक वाटपाचा कार्यक्रम 15 ऑगस्ट रोजी नगरपरिषद कार्यालयात संपन्न झाला. मागील महिनाभर या संस्थेत फॅशन डिझाईनिंग, केक, मेहंदी व पार्लर कोर्सचे प्रशिक्षण घेत कोर्स पूर्ण झालेल्या 200 महिलांना नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रके प्रदान करण्यात आली.
मीरा महिला बहूउद्देशीय सेवाभावी संस्थेमार्फत विविध कोर्सचे प्रशिक्षण महिलांसाठी उपलब्ध असून जास्तीत जास्त महिलांनी याचा लाभ घावा असे आवाहन यावेळी नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांनी केले तसेच महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी त्यांना स्वयंपूर्ण बनविण्यासाठी ही संस्था कार्यान्वित आहे व लोणावळ्यातील महिलांनी याचा लाभ घ्यावा अशी माहिती संस्थेच्या अध्यक्षा रेश्मा शेख यांनी दिली आहे.
या संस्थेमार्फत लोणावळा नगरपरिषदेच्या उर्दू शाळेत याचे मोफत प्रशिक्षण देण्यात येत आहे असेही यावेळी बोलताना रेश्मा शेख म्हणाल्या. सदर कार्यक्रमास विद्यमान नगरसेवक श्रीधर पुजारी, मंदा सोनवणे, रचना सिनकर, विशाल पाडाळे व सर्व प्रशिक्षनार्थी महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या.