मावळ (प्रतिनिधी):मावळातील मुंढावरे गावचे विद्यमान सरपंच नवनाथ हेलम यांचा राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भाऊ भेगडे याच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टी मध्ये जाहीर पक्ष प्रवेश.
यावेळी संघटनमंत्री किरण राक्षे , सरचिटणीस गणेश ठाकर , कामगार आघाडी अध्यक्ष अमोल भेगडे , मा.सरपंच बाळासाहेब वाघमारे , मा . सदस्य शेखर वाघमारे , सोमनाथ वाघमारे , दिपक गायकवाड उपस्थित होते .राज्यातील सत्तांतरानंतर मावळ तालुक्यात भाजपमध्ये पक्ष प्रवेश करणारे सरपंच नवनाथ हेलम हे पहिले आहेत .
मावळ तालुक्यातील इतर ग्रामपंचायतीचे सरपंच , उपसरपंच आणि सदस्य तसेच नगरपंचायतीचे अनेक नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी आमच्या संपर्कात असल्याचे तालुकाध्यक्ष रवींद्र आप्पा भेगडे यांनी सांगितले.