मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघात कंटेनर ने दिली समोरील कंटेनर ला जोरदार धडक एक जण जागीच ठार.

0
243

( खालापूर -दत्तात्रय शेडगे )

मुंबई पुणे एक्सप्रेसववेवर आज सायंकाळी 5:30 वा. सुमारास अपघात घडला. मागून येणाऱ्या कंटेनर ने समोरील कंटेनर ला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला, या अपघातात कंटेनर मधील चालक जागीच ठार झाला.


पुण्या हुन मुंबई कडे क्वॉईल घेऊन जाणाऱ्या कंटेनर ला पाठीमागून दुसऱ्या कंटेनरचालकाला कंट्रोल न झाल्याने त्याने समोरील कंटेनर ला जोरदार धडक देऊन भीषण अपघात झाला या अपघातात कंटेनर चालक जागीच ठार झाला तर कंटेनर चे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले,