Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडमुंबई पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघात टँकरने कारला दिली पाठीमागून जोरदार धडक, दोन...

मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघात टँकरने कारला दिली पाठीमागून जोरदार धडक, दोन जण जखमी..

प्रतिनीधी-दत्तात्रय शेडगे.

मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर अपघाताची मालिका सतत सुरूच असुन आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर किमी 37 जवळ एका टँकर ने कारला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला,या अपघातात कार मधील दोन जण जखमी झाले आहेत.


आज सकाळी पुण्याहून मुबंई कडे टँकर व कार जात असताना टँकरचालकाचे टँकर वरील नियंत्रण सुटल्याने समोरील कारला टँकरने जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला या अपघातात कार मधील चालक व अन्य एक जणाला दुखापत झाली असून त्यांना पुढील उपचारासाठी तात्काळ पाठविण्यात आले तर कारचा चक्काचूर झाला आहे.


या अपघाताची माहिती मिळताच बोरघाट पोलीस, देवदूत यंत्रणा,अपघातग्रस्त टीमचे सदस्य तात्काळ घटनास्थळी दाखल होत कार मध्ये अडकलेल्यानं बाहेर काढून पुढील उपचारासाठी पाठवून दिले.

- Advertisment -

You cannot copy content of this page