Thursday, October 31, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडमुंबई -पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघात दुधाच्या टँकरने दिली ट्रेलरला जोरदार धडक..

मुंबई -पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघात दुधाच्या टँकरने दिली ट्रेलरला जोरदार धडक..

मुंबई -पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघात दुधाच्या टँकरने दिली ट्रेलरला जोरदार धडक, दोघांचा जागीच मृत्यू .

खोपोली – दत्तात्रय शेडगे
मुबंई पुणे एक्सप्रेस वेवर मुंबई लेनवर भातान बोगदा पंक्चर काढण्यासाठी उभ्या असलेल्या ट्रेलर ला दुधाच्या टँकर ने पाठी मागून जोरदार धडक दिल्याने भिषण अपघात झाला या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला .

माहिती नुसार , ट्रेलर नंबर RJ-02-JB -2043 याचा पंक्चर काढण्याचे काम सुरू असताना पाठीमागून भरधाव येणाऱ्या दुधाचा टँकरने (टँकर नंबर MH-43-AD-6029) जोरदार धडक दिल्याने मोठा अपघात घडला. यात दुधाच्या टँकरचा ड्रायव्हर हाजी फुला वय 43 रा . वाराणसी उत्तर प्रदेश व सहप्रवासी विजय निवृत्ती मरगज वय 41 रा. विले पार्ले ईस्ट मुंबई हे दोघे जागीच मयत झाले आहेत .

दोन्ही मयतास आयआरबी रस्ता सुरक्षा व वाहतूक नियंत्रण पथकाने चौक ग्रामीन रुग्णालय येथे नेले आहे .

- Advertisment -

You cannot copy content of this page