मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर तेलाचा टँकर पलटी,एक्सप्रेस वेवर तेलाचा थर,काही काळ एक्सप्रेसवे बंद..

0
351

अपघाताचा व्हिडिओ पहा.

खोपोली- दत्तात्रय शेडगे

खोपोली- मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर आडोशी बोगद्याजवळ आँईलचा टँकर उलटल्याने भीषण अपघात झाला, या अपघातात टँकर मधील आँईल रस्त्यावर पसरल्याने मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक काही काळ बंद ठेवण्यात आली होती.


पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणारा आँईल टँकर एक्सप्रेस वेवरील आडोशी बोगद्याजवल ऑइलचा टँकर पलटी झाला, यात टँकर मधील सर्व ऑइल एक्सप्रेस वेवर सांडल्याने एक्सप्रेस वरील वाहने सरकू लागल्याने खबरदारीचा उपाय म्हणून द्रुतगती मार्गावरील मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक थांबविण्यात आली आहे.

खाजगी लहान वाहने ही वलवण लोणावळा येथून जुन्या महामार्गावर वळविण्यात आली आहेत तर मोठी अवजड वाहने थांबविण्यात आली आहे. लोणावळा शहरात अचानक वाहनांची गर्दी वाढल्याने गवळीवाडा नाका परिसरात वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. सुमारे तीन तासापासून वाहतुक खोळंबल्याने मुंबई लेनवर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

फायर ब्रिगेडच्या वाहनांतून रस्त्यावर पाणी मारत रस्ता धुण्याचे तसेच आँईलवर माती टाकत चिकटपणा काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. खंडाळा महामार्ग सहाय्यक पोलीस निरिक्षक मंडले यांचे पथक वलवण गावाजवळ वाहतुक नियंत्रित करत आहेत तर पोलीस उपनिरीक्षक जगदीश परदेशी व बोरघाट पोलीस घटनास्थळावर परिस्थिती नियंत्रणात आणत आहेत.