Tuesday, September 26, 2023
Homeमहाराष्ट्ररायगडमुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर ट्रक ने दिली ट्रेलर ला धडक, तीन जण गंभीर...

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर ट्रक ने दिली ट्रेलर ला धडक, तीन जण गंभीर जखमी..


प्रतिनिधी-दत्तात्रय शेडगे.

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या भरधाव ट्रक वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक पुढे जाणाऱ्या ट्रेलर वर मागील बाजूने आदळले धडक एवढी जोरदार होती की ट्रक समोरील केबिन पूर्णपणे चक्काचूर झाली तर ट्रक मधील चालक तसेच अन्य दोघे केबिनमध्ये अडकून पडले अपघातात या तिघांनाही गंभीर दुखापत झाली आहे हा अपघात एक्सप्रेसवेवर किलोमीटर 39 येथे झाला.

अपघाताची माहिती मिळताच बोरघाट पोलीस आयआरबी यंत्रणा तसेच देवदुत यांच्या मदतीने जखमी तिघांना ट्रक मधून काढण्यात आले तसेच त्यांन उपचाराकरिता तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अपघाता दरम्यान मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर पुणे लेन वर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती परंतु पोलिसांनी अपघातग्रस्त वाहन क्रेनच्या साह्याने महामार्गावरून बाजूला केल्याने सध्या वाहतूक सुरळीत झाली आहे.
- Advertisment -