मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर डेल्ट्रा फोर्सच्या गाडीला ट्रकची धडक, एक जण गंभिर जखमी..

0
76

प्रतिनिधी (दत्तात्रय शेडगे)
मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर सुरक्षा गस्त घालणार्‍या डेल्ट्रा फोर्सच्या गाडीला एका ट्रकने मागून जोरात धडक दिल्याने झालेल्या अपघातात डेल्ट्रा फोर्सचा कर्मचारी अनिल भोईर हा गंभिर जखमी झाला आहे.आज सकाळच्या सुमारास किमी 18 जवळ हा अपघात झाला.

मिळालेल्या माहितीनुसार डेल्ट्रा फोर्सचे वाहने नेहमीप्रमाणे एक्सप्रेस वेवर गस्त घातल होते. एक्सप्रेस वेवर कोठे अपघात झाला, नादुरुस्त वाहन रस्त्यावर थांबले आहे अथवा अन्य काही सुरक्षा विषयक कामे याची पाहणी डेल्ट्रा फोर्स करत असते.

आज सकाळी भोईर हे वाहनांमधून गस्त घालत असताना मागून वेगात आलेल्या ट्रकने त्यांना धडक दिल्याने हा गंभिर अपघात झाला. यामध्ये भोईर यांच्या डोक्याला मार लागला आहे.