मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर आमदार प्रसाद लाड यांच्या वाहनाचा अपघात आमदार लाड सुखरूप बचावले..

0
425

खोपोली- दत्तात्रय शेडगे

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर ओझर्डे गावाजवळ आमदार प्रसाद लाड यांच्या इनोवा क्रिस्टा कारचा टायर फुटल्याने अपघात झाला आहे परंतु वाहनाचा वेग कमी असल्याने चालकाने वेळीच वाहन नियंत्रित केल्याने मोठी दुर्घटना टळली .

आमदार लाड हे मुंबईवरून पुण्याच्या दिशेने जात असताना 79 किलोमीटर ओझर्डे गावाच्या हद्दीत पाच वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला अपघातात कोणीही जखमी नसून अपघातग्रस्त वाहनाचा डाव्या बाजूचा टायर फुटलेला आहे. घटनेनंतर दुसऱ्या वाहनाने आमदार लाड हे तात्काळ पुण्याच्या दिशेने रवाना झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.