Sunday, April 21, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडमुंबई पुणे एक्सप्रेस वे वर कार उलटून अपघात, एकाचा मृत्यू, तीन किरकोळ...

मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर कार उलटून अपघात, एकाचा मृत्यू, तीन किरकोळ जखमी…

खोपोली(प्रतिनिधी) : मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर किमी 36/200 जवळ एक मोटार कार चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने सुरक्षा रेलिंगला धडकून पलटी होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात चालकाचा मृत्यू झाला आहे.दि.4 रोजी रात्री 2:00 वा. च्या सुमारास मुंबई लेनवर ही दुर्घटना घडली आहे .
कार चालक विजय मंगल पाटील ( वय 57 , रा . कांजूरमार्ग , मुंबई ) हे या अपघातात मयत झाले असून कार मध्ये एक महिला व दोन मुलांचा समावेश होता. महिला व दोन मुले हे किरकोळ जखमी झाले आहेत .
कारमध्ये अडकलेल्या चालकाला बाहेर काढण्यासाठी व अपघातग्रस्थ्यांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे सदस्य विजय भोसले व इतरांनी सहकार्य केले.
- Advertisment -

You cannot copy content of this page