Monday, July 15, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडमुंबई - पुणे एक्सप्रेस वे वर विकेंड लॉकडाऊनमुळे वाहनांचा शुकशुकाट..

मुंबई – पुणे एक्सप्रेस वे वर विकेंड लॉकडाऊनमुळे वाहनांचा शुकशुकाट..


प्रतिनिधी-दत्तात्रय शेडगे.


खालापूर.महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. राज्यातील प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसतोय.

त्यामुळे राज्यात रात्रीची संचारबंदी आणि शनिवार – रविवार विकेंड लॉकडाऊन लावण्यात आल्याने याचे पडसाद गजबणारा मुंबई – पुणे एक्सप्रेस वरील वाहतूकीवर पाहायला मिळाल्याने दररोज लाखो वाहनांची वाहतूक असणाऱ्या या मार्गावर तुरळकच वाहतूक पाहायला मिळाली.


कोरोना प्रादुर्भाव महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात वाढत असून पॉझीटीव्ह रुग्णसंख्येत वाढ होत आहे. परिणामी प्रशासनाने निर्बंध जारी केले असल्याने शनिवार, रविवारी विकेंडच्या दिवशी तर कडक लॉकडाऊन करण्यात आले असल्याने मुंबई – पुणे एक्सप्रेस वे आणि जुन्या मुंबई – पुणे हायवेवर अत्यावश्यक सेवा वगळता वाहतूक बंद असल्याचे पाहायला मिळाले तर एरवी गजबजलेले रस्ते पुन्हा एकदा निर्मनुष्य झाले आहेत.

तर नेहमी गजबजलेल्या मुंबई – पुणे एक्सप्रेस वे वर विकेंड लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या मार्गावर निवडकच वाहने अगळता पूर्णपणे शुकशुकाट दिसत असून केवळ अत्यावश्यक सेवेमधील गाड्या नियमांचे पालन करत सुरू आहेत.

- Advertisment -

You cannot copy content of this page