Sunday, July 14, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडमुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर दुधाची वाहतूक करणारा टँकर पलटी, अपघातात एकाचा मृत्यू…

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर दुधाची वाहतूक करणारा टँकर पलटी, अपघातात एकाचा मृत्यू…


प्रतिनिधी-दत्तात्रय शेडगे

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर खंडाळा बोगद्याजवळ मुंबईकडे दुधाची वाहतूक करणारा भरधाव टँकर पलटल्याने अपघात झाला आहे अपघाता दरम्यान टँकर ओव्हर स्पीड असल्याने जवळपास पन्नास फूट पुढे अपघातानंतर टँकर फरपटत पुढे गेला असून सुदैवाने या टँकरची इतर कुठल्याही वाहनाला धडक लागली नसल्याने महामार्गावरील मोठी दुर्घटना टळली आहे .
परंतु दुर्दैवाने टँकर अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाला असून नेमका टँकर मध्ये अडकलेला मृतदेह चालक किंवा क्लिनर चा आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही टँकर हा महामार्गावरील मिडल लाईनवर आडवा झाला असल्याने मुंबईकडे जाणारीएक लेन सध्या बंद झाली आहे .
महामार्ग पोलीस घटनास्थळावर दाखल झाले असून एक्सप्रेसवेवर वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी सर्वतोपरीने प्रयत्न सुरू आहेत काही वेळात याठिकाणी अवजड क्रेनच्या सहाय्याने पलटलेला टँकर महामार्गावरून बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात येणार असल्याची माहिती महामार्ग पोलिसांकडून देण्यात आली आहे.

- Advertisment -

You cannot copy content of this page