मुंबई पुणे जुन्या महामार्गावर दुचाकीचा अपघात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू…

0
602

प्रतिनिधी- दत्तात्रय शेडगे.


खोपोली दि.8: मुबंई पुणे जुन्या महामार्गावर चौक आसरोटी जवळ एका दुचाकी स्वाराने टेम्पोला जोरदार धडक दिल्याने भीषन अपघात झाला या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे.

मुबंई पुणे जुन्या महामार्गावरून पुण्याहून मुबंई कडे स्पोर्ट बाईक घेऊन दुचाकीस्वार भरधाव वेगात जात असताना चौक आसरे जवळ टेम्पो ला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला तर दुचाकीचा चक्काचूर झाला.