Friday, June 14, 2024
Homeपुणेलोणावळामुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर अवजड वाहनांना रात्री 10 ते पहाटे 5 पर्यंत...

मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर अवजड वाहनांना रात्री 10 ते पहाटे 5 पर्यंत बंदी, गोल्डन अवर्स सुरु…

लोणावळा (प्रतिनिधी): सध्या शाळांना सुट्टया सुरू झाल्या असल्यामुळे मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर खंडाळा बोर घाट येथे गेल्या काही दिवसापासून सतत वाहतूक कोंडी होत आहे. या सतत होणाऱ्या वाहतूक कोंडीवर मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील पोलिसांनी तोडगा काढला आहे.
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गा वर सतत वाहतूक कोंडी होत असल्याने याचा वाहनचालकांना त्रास सहन करावा लागतो.त्यामुळे आता चारचाकी वाहनांची संख्या द्रुतगती महामार्गावर वाढली की अवजड वाहनांना गोल्डन अवर्स सुरू करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे.
त्यानुसार अवजड वाहनांना रात्री 10 ते पहाटे 5 पर्यंत प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. तर पहाटे 5 ते रात्री 10 पर्यंत सदरची वाहने त्या दिशेने प्रवास करीत असताना वेगवेगळ्या ठिकाणी थांबवली जात आहेत.वाहतूक कोंडी फोडण्याकरिता गोल्डन अवर्स करून अवजड वाहनाचे प्रमाण घाटामध्ये कमी करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. तसेच हलक्या वाहनांचे प्रमाण जास्त होताच ब्लॉक घेऊन वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न बोरघाट पोलिस वाहतूक केंद्राकडून करण्यात येत आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page