Wednesday, May 29, 2024
Homeपुणेलोणावळामुंबई पुणे द्रुतगती मार्गावर ट्रक उलटून अपघात कोणतीही जीवितहानी नाही…

मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर ट्रक उलटून अपघात कोणतीही जीवितहानी नाही…

लोणावळा (प्रतिनिधी ):मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर खंडाळ्याजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक दुभाजकाला धडकून रस्त्यावर पलटी झाला.आज शनिवार दि. 25 रोजी सकाळच्या सुमारास हा अपघात घडला.
द्रुतगती मार्गावर किलोमीटर 45/300 वर मुंबई च्या दिशेने जाण्याऱ्या लेनवर हा अपघात घडला. यात ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने सदरचा ट्रक सुरक्षा भिंतीवर आदळला आणि लेनवरच पलटी झाला.सुदैवाने मुख्य लेनवर हा अपघात झाला तेव्हा वाहनांची संख्या अधिक नसल्याने मोठी दुर्घटना टळली तसेच कोणतीही जिवितहानी झाली नाही.
मात्र ट्रक चालक या अपघातात किरकोळ जखमी असून त्यास रुग्णवाहिकेतून ताबडतोब उपचारार्थ पाठवण्यात आले. तसेच आयआरबी पेट्रोलिंग आणि महामार्ग पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने ट्रक बाजूला करत वाहतूक सुरळीत केली.
- Advertisment -

You cannot copy content of this page