Friday, October 18, 2024
Homeपुणेलोणावळामुंबई पुणे द्रुतगती मार्गावर खंडाळा एक्सिट जवळ तेलाच्या टँकरला भीषण आग…

मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर खंडाळा एक्सिट जवळ तेलाच्या टँकरला भीषण आग…

लोणावळा(प्रतिनिधी):मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर तेलाच्या टँकरने पेट घेतला. ही घटना मंगळवार दि.13 रोजी सकाळी 11:45 वा.च्या सुमारास खंडाळा एक्झिट जवळ घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर खंडाळा एक्झिट येथे एका तेलाच्या टँकरने अचानक पेट घेतला. आगीने रौद्र रूप धारण केले, या घटनेमध्ये एक महिला गंभीर जखमी झाली आहे, महिलेला नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
तर आणखी जण जखमी असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.आग लागण्याच्या घटनेमुळे दोन्ही मार्गावरील वाहतूक थांबविण्यात आली आहे. यामुळे दोन्ही मार्गावर लांबपर्यंत वाहनाच्या रांगा लागल्या आहेत. दरम्यान घटनास्थळी अग्निशमन यंत्रणा, देवदूत, महामार्ग पोलीस अशा सर्व यंत्रणांनी धाव घेतली असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page