Tuesday, February 27, 2024
Homeपुणेलोणावळामुंबई पुणे महामार्गावर लोणावळ्यातील हॉटेल रिदम समोर अज्ञात वाहनाच्या धडकेने दुचाकी स्वार...

मुंबई पुणे महामार्गावर लोणावळ्यातील हॉटेल रिदम समोर अज्ञात वाहनाच्या धडकेने दुचाकी स्वार दोघांचा मृत्यू…

लोणावळा (प्रतिनिधी) : जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर लोणावळ्यातील रिदम हॉटेलसमोर एका अज्ञात वाहनाने मोटारसायकलला जोरात धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोटारसायकलवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना सोमवार दि.27 रोजी रात्री 12:10 वाजण्याच्या दरम्यान घडली आहे. अपघातातील दोन्ही मयत हे वीटभट्टी कामगार असून दोघे सख्खे साडू होते.
दीपक परशुराम पवार (वय 28 ) आणि लक्ष्मण तातुराम वाघमारे (वय 30 ) असे अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे असून हे दोघेही सावरोली,खोपोली, रायगड येथील रहिवासी आहेत.
लोणावळा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक आणि लक्ष्मण हे दोघे सख्खे साडू लोणावळ्याजवळील देवघर येथील एका वीटभट्टीवर कामगार होते. ते रविवारी काही कामानिमित्त त्यांच्या गावाला मोटारसायकल क्रमांक MH – 06 AM -6395 याने गेले होते. रविवारी रात्री ते पुन्हा गावाहून देवघरला परत येताना जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर लोणावळ्यातील रिदम हॉटेलसमोर त्यांच्या मोटारसायकलला एका अज्ञात वाहनाने जोरात धडक दिल्याने झालेल्या अपघातात गंभीर दुखापत होऊन त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला.याप्रकरणी पोलीस कर्मचारी नितेंद्र कदम यांनी लोणावळा शहर पोलीस स्टेशमध्ये फिर्याद दिली आहे.
अपघाताची माहिती मिळताच लोणावळा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी नितेंद्र कदम व शिवा धनगर आणि सरकारी वाहन चालक यांनी घटनास्थळी धाव घेत घटनेची पाहणी करत दोघांना रुग्णवाहिकेच्या साहाय्याने नजिकच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले.परंतु उपचारापूर्वीच दोघांचा मृत्यू झाला. पोलीस निरीक्षक सिताराम डुबल यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस हवालदार शकील शेख हे करत आहेत.
- Advertisment -

You cannot copy content of this page