Monday, July 15, 2024
Homeपुणेलोणावळामुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर वलवण फाट्याजवळ दुचाकीचा अपघात एकाचा जागीच मृत्यू..

मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर वलवण फाट्याजवळ दुचाकीचा अपघात एकाचा जागीच मृत्यू..

लोणावळा दि.7: मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर नारायणी धाम पोलीस चौकीजवळील वलवण फाट्यावर दुचाकीचा अपघात एकाचा जागीच मृत्यू तर दोन जन गंभीर व एकजण किरकोळ जखमी.

मिळालेल्या माहिती नुसार महामार्गावर एक एस टी बस बंद पडल्याने रस्त्यावर उभी होती व त्यामुळे बसच्या आजूबाजूने वाहने आपला मार्ग काढत पुढे जात होती याच गडबडीत पुण्याच्या दिशेने येत असलेल्या दोन दुचाकी आपापसात गडबडून पडल्या व समोरून मुंबईच्या दिशेने पुण्याकडे जाणाऱ्या पिकअप ला घसरत जाऊन जोरात धडकल्या.

या अपघातात दुचाकी स्वार ऋषिकेश गजानन गावंडे ( रा. अकोला ) याचा जागीच मृत्यू झाला तर सचिन गावंडे आणि सौरभ गावंडे हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत व महादेव कोलतकार हा किरकोळ जखमी असून सर्व जखमींना उपचारासाठी कामशेत येथील महावीर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

- Advertisment -

You cannot copy content of this page