Monday, July 22, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडमुंबई विद्यापीठाला " ओव्हरऑल चॅम्पियनशिप " मध्ये ब्रॉन्झ पदक मिळवण्यात यशचे योगदान...

मुंबई विद्यापीठाला ” ओव्हरऑल चॅम्पियनशिप ” मध्ये ब्रॉन्झ पदक मिळवण्यात यशचे योगदान !

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) मुंबई विद्यापीठाच्या झोनल, स्टेट आणि नॅशनल टीम मध्ये आजपर्यंत अनेक पदके व विजयश्री संपन्न करून आपल्या कॉलेज बरोबरच जन्मभुंमी कर्जत व भिसेगावचे नाव पुन्हा एकदा संगीत विश्वात ” यश शरद हजारे ” याच्यामुळे चमकून गेले आहे . नॅशनल युथ फेस्टिवल – २०२४ मध्ये मुंबई विद्यापीठाला ओव्हर ऑल चॅम्पियनशिप मध्ये विविध वाद्यांवर साथ देण्यात यश हजारे याने आपले संगीतातील कसब पणाला लावून यावर्षीच्या चॅम्पियनशिप मध्ये अटीतटीच्या स्पर्धेत ब्रॉन्झ मेडल मिळण्यात यश प्राप्त झाले आहे.

कर्जत सारख्या ग्रामीण भागात व भिसेगाव या छोट्याशा गावात राहून मुंबईतील एका उच्च हाय फाय कॉलेज मध्ये प्रवेश मिळवून तिथे आपला टिकाव लागणे, शेकडो विद्यार्थ्यांमधून विद्यापीठाच्या संगीत टीम मध्ये सिलेक्शन होणे, आणि संगीत विश्वात देखील उत्तम सहभाग , उत्तम वागणून , उत्तम व्यवहार ठेऊन स्पर्धेत निभाव लागणे , हे यश हजारे याने ” लिलया आव्हान ” पेलले.

यश हजारे याच्या या यशामुळे त्याच्यावर शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत असून मुंबई विद्यापीठच्या सर्व पदाधिकारी – शिक्षक – विद्यार्थी – मित्रांचे तसेच त्याचे मार्गदर्शक वडील शरद हजारे यांचे देखील अभिनंदन होत आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page