Tuesday, July 23, 2024
Homeपुणेपिंपरी चिंचवडमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वाहतूक सेनेच्या वतीने वृक्षारोपणाचा कार्यक्रम सातत्याने सुरू.....

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वाहतूक सेनेच्या वतीने वृक्षारोपणाचा कार्यक्रम सातत्याने सुरू…..

पुणे दि.17: माननीय शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या 61 व्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण महाराष्ट्र राज्यात 13 जून ते 27 जुलै या कालावधीत महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या वतीने 61 हजार झाडे लावण्यात येणार आहेत.

त्याच अनुषंगाने महाराष्ट्र वाहतूक सेना पुणे जिल्ह्याच्या वतीने अनेक भागांत विविध प्रकारची झाडे लावण्यात येत असून आज चिंचवड येथील काळभोर नगर मधील प्रतिभा कॉलेज याठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची झाडे लावून वृक्षारोपण करण्यात आले.

त्यावेळी शिवसेना संपर्क प्रमुख व महाराष्ट्र वाहतूक सेना पुणे जिल्हाध्यक्ष महेशभाऊ केदारी,महिला आघाडी शिरूर लोकसभा संपर्कप्रमुख व माजी नगरसेविका सुलभाताई उबाळे, विभाग प्रमुख श्रीमंत गीरी, रा. स. प. पुणे जिल्हा संपर्क प्रमुख गणेश खरात, पांडुरंग माने, व्यापारी सेना अध्यक्ष राज गिरी व कॉलेजच्या उपप्राचार्य डॉ. वनिता कुराडे, प्राध्यापक सुरेखा कुंभार, प्राध्यापक राकेश कुंभार, प्राध्यापक रघुनाथ ताम्हणे, प्राध्यापक संध्या गोरे, प्राध्यापक सुनीता गायकवाड यांसमवेत कॉलेज कर्मचारी वर्ग उपस्थित होता. सदर वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र वाहतूक सेनेचे उपाध्यक्ष बाबीर मिटकरी व पिंपरी – चिंचवड शहर उपाध्यक्ष शिवकुमार कापसे यांनी केले होते.

- Advertisment -

You cannot copy content of this page