Friday, February 23, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना दिल्या आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी शुभेच्छा…

मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना दिल्या आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी शुभेच्छा…

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) ” गुरू शिवाय या जगात योग्य मार्ग मिळत नाही ” , या गुरुंप्रती काहीही करण्यास शिष्य तयार असतो , याचा प्रत्यय कर्जत – खालापूर मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी दाखवून दिले आहे . महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री मान . एकनाथजी शिंदे साहेब हे आमदार महेंद्र शेठ थोरवे यांचे ” राजकीय गुरू ” आहेत . आज ९ फेब्रुवारी २०२४ रोजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचा वाढदिवस असल्याने आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी वर्षा बंगल्यावर जाऊन त्यांना वाढदिवसानिमित्त सदिच्छा भेट घेवून शुभेच्छा दिल्या.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे नगरविकास मंत्री व नंतर मुख्यमंत्री झाल्यावर शेकडो करोड रुपयांचा निधी आपले लाडके शिष्य म्हणून असलेले आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या कर्जत खालापूर मतदार संघासाठी दिलेला आहे . तर आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी देखील ते मुख्यमंत्री होण्यासाठी आपले ” अस्तित्व पणाला ” लावल्याचे संपूर्ण महाराष्ट्राने बघितले आहे . त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व आमदार महेंद्र शेठ थोरवे यांचे नाते अगदी जिव्हाळ्याचे आहेत.
गेल्याच महिन्यात ७ जानेवारी रोजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब कर्जत येथे येवून कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या ” संकल्पनेतून साकारलेल्या ऐतिहासिक वास्तूंचा ” लोकार्पण सोहळ्यात उपस्थित राहून त्यांच्या कार्याची वाहवा केली होती.

आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना शुभेच्छा देवून त्यांचे आशीर्वाद घेतले.
- Advertisment -

You cannot copy content of this page