Tuesday, September 26, 2023
Homeपुणेमावळमुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांनी आज ओझर्डे येथील ट्रॉमा केअर सेंटर ची...

मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांनी आज ओझर्डे येथील ट्रॉमा केअर सेंटर ची पहाणी केली.

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वरील लोणावळा कुसगाव येथून सुरू होणाऱ्या भुयारी बोगद्याच्या तसेच मिसिंग लींक या कामाची पाहणी व आढ़ावा घेण्या करता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे जवळील सिंहगड कॉलेज जवळ दाखल झाले आहेत त्यांच्यासोबत नगर विकास तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे ऊर्जामंत्री नितीन राऊत मावळचे आमदार सुनील शेळके सुद्धा दाखल झाले होते.
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील घाट माथ्यावरील होणारी देंनंदिन वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी तसेच मुंबई-पुणे हे अंतर कमी करण्यासाठी मीसींग लिंक या नवीन रस्त्यांची निर्मिती रस्ते विकास महामंडळाकडून सुरू करण्यात आलेले आहे या दरम्यान महामार्गावर दोन मोठ्या भुयारी मार्गाचे काम सध्या सुरू असून आज मुख्यमंत्र्यांकडून या कामाचा पाहणी आढावा घेण्यात येत आहे.
- Advertisment -