Sunday, September 8, 2024
Homeमहाराष्ट्रमुख्यमंत्र्यांनंतर शरद पवार व अनिल देशमुख यांनाही धमकीचे फोन..

मुख्यमंत्र्यांनंतर शरद पवार व अनिल देशमुख यांनाही धमकीचे फोन..


मुंबई: कालच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे यांना धमकीचे फोन आले होते. आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष माननीय शरद पवार तसेच महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही धमकीचे फोन आले आहेत.

महाविकास आघाडीच्या तीन नेत्यांना असे धमकीचे फोन आल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची वाय.बी.चव्हाण सेंटर मध्ये भेट घेतली आहे. धमक्यांच्या संदर्भात दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान मातोश्री उडवून देण्याची धमकी देणारा फोन आल्याचे काल समोर आले होते.आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाही भारताबाहेरून धमकीचा फोन आल्याची माहिती समोर येत आहे.


तसेच महाराष्ट्र राज्याचे गृह मंत्री अनिल देशमुख यांनाही धमकीचे फोन आले आहेत.कंगना रनौत विषयी टिपणी केल्यामुळे हे फोन आले आहेत अशी माहिती समोर येत आहे. परंतु हे फोन कोणाकडून आले आहे हे स्पष्ट झालेले नाही.

- Advertisment -

You cannot copy content of this page