मुद्रे – ( बु ) प्रभागात विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा संपन्न !

0
784

खासदार श्रीरंग बारणे , आमदार महेंद्रशेठ थोरवे व नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांची प्रमुख उपस्थिती.

भिसेगाव- कर्जत(सुभाष सोनावणे)कर्जत नगर परिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक ५ , मुद्रे ( बु ) परिसरातील नगरसेविका तथा महिला व बाल कल्याण उपसभापती सौ . संचिता संतोष पाटील यांनी मागणी केलेल्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा नगर विकास विभागाच्या माध्यमातून निधी प्राप्त झालेल्या शिव ओम कॉम्प्लेक्स ते फायर ब्रिगेड येथील रस्त्याचे भूमिपूजन , पथदिवे , तसेच कचेरी रोड मुद्रे ( बु ) येथील ओपन जिम परिसरातील पेव्हर ब्लॉक आणि इतर सुशोभीकरणाचा लोकार्पण सोहळा सोमवार दि.२८ फेब्रुवारी २०२२ रोजी सायंकाळी ५ -३० वाजता मावळचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे ,कर्जत खालापूर मतदार संघाचे आमदार महेंद्रशेठ थोरवे व कर्जत नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ. सुवर्णा जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांच्या शुभ हस्ते मोठया उत्साहात पार पडले.


यावेळी झालेल्या छोटेखाणी कार्यक्रमात व्यासपीठावर खासदार श्रीरंग आप्पा बारणे , आमदार महेंद्रशेठ थोरवे , नगराध्यक्षा सौ . सुवर्णा जोशी , मुख्याधिकारी डॉ . पंकज पाटील , उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल , उपजिल्हा प्रमुख भाई गायकर ,बांधकाम सभापती राहुल डाळिंबकर , महिला व बालकल्याण उपसभापती संचिता पाटील , समाज कल्याण सभापती वैशाली मोरे , स्वामींनी मांजरे , नगरसेवक उमेश गायकवाड , विवेक दांडेकर , मधुरा चंदन , पुष्पा दगडे , भारती पालकर ,सुवर्णा निलधे , संकेत भासे ,सोमनाथ ठोंबरे , बळवंत घुमरे , माजी नगरसेवक संतोष पाटील ,त्याचप्रमाणे शिवसेना – भाजपा व आरपीआय चे पदाधिकारी , महिला व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी रस्त्याचे भूमिपूजन झाल्यावर सर्वांचे स्वागत शाल – पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन करण्यात आले.यावेळी मार्गदर्शन करताना खासदार आप्पा बारणे म्हणाले कि , महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.उद्धव साहेब ठाकरे यांच्या माध्यमातून कर्जत – खालापूर मतदार संघात मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन दिला आहे .

४० वर्षे समाजसेवेत काम करताना कधीच दुजाभाव केला नाही , जनतेचा प्रतिनिधी म्हणून काम केले ,म्हणूनच नेहमी विकासासाठी जोर लावला, कर्जतमध्ये नागरीकरण मोठ्या गतीने होत आहे,म्हणून नागरी सुविधा वाढविणे गरजेचे असून त्यासाठी मोठया प्रमाणात निधी उपलब्ध करून देऊ ,असे आश्वासन दिले.मा.मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांनी इतर राज्याचे मुख्यमंत्री पेक्षा जास्त काम या कोरोना काळात केले आहे , यावर प्रकाश टाकत समस्या सोडवत असताना नागरिकांशी कनेक्ट रहा ,असा सल्ला हि त्यांनी लोकप्रतिनिधी यांना दिला.

१०० करोड रुपये मा.नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी मावळ लोकसभा मतदार संघाला निधी दिले ,मा.आदित्य साहेब ठाकरे यांनी ही मोठया प्रमाणात निधी दिला आहे.

नगराध्यक्षा सौ.सुवर्णा जोशी यांचे काम वाखाणण्याजोगे व उत्कृष्ठ आहे, अशी प्रशंसा त्यांनी केली.तर आमदार महेंद्रशेठ थोरवे म्हणाले कि , महाराष्ट्रावर सत्ता आल्यावर कर्जत तालुक्यात खऱ्या अर्थाने विकास कामांची सुरुवात झाली.ऐतिहासिक कामांना सुरुवात करून स्वर्गीय डॉ नानासाहेब धर्माधिकारी यांचे कर्जत नगरीत प्रवेशद्वार ,कर्जत तालुका हा वारकरी संप्रदायचा असल्याने येथे प्रति आळंदी उभी रहाणार असून छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक उभे राहिल्याने , व नदी संवर्धन प्रकल्प होणार असल्याने पर्यटन क्षेत्राला साजेसा बदल होणार असून पर्यटनामुळे येथे रोजगार उभा राहील यावर प्रकाश टाकला ,भविष्यात पाण्यासाठी निधी उपलब्ध करून देणार असून शहरात क्रीडा संकुल उभे करून क्रिकेट , कबड्डी या मैदानी खेळास प्राधान्य मिळून नवनवीन खेळाडू तयार होतील असे आश्वासन याप्रसंगी दिले.

याप्रसंगी कर्जत न.प.च्या नगराध्यक्षा सौ . सुवर्णा जोशी यांनी सांगितले कि , 2 वर्षे कोरोना काळात गेली तरी सर्वांच्या सहकार्याने या संकटावर मात करून विकास साधला असून कर्जत नगरीचे विकास कामांमुळे कायापालट केला असल्याचे सांगितले.

कबड्डी खेळासाठी मुद्रेकरांनी मैदानाची मागणी केल्यामुळे भविष्यात मैदान उपलब्ध करून देऊ , तसेच पाण्याची समस्या देखील लवकरात लवकर सोडवू , असे आश्वासन दिले.तर बांधकाम सभापती राहुल डाळींबकर यांनी महायुतीचे खासदार – आमदार तसेच नगर विकास मंत्री आपलेच असल्याने जास्तीत जास्त निधी कर्जत तालुक्यासाठी आणून कायमस्वरूपी पाण्याची समस्या सोडविण्याची मागणी केली.

यावेळी पथदिव्यांचे व ओपन जिम सुशोभीकरणाचा लोकार्पण सोहळा मान्यवरांच्या हस्ते पार पडला . संयुक्त महाराष्ट्राचे चित्र , कबड्डी खेळाचे दृश्य , कर्जतचा जगप्रसिद्ध वडापाव , दहिवलीतील ऐतिहासिक विठ्ठल मंदिर ,माथेरानची झुकझुक गाडी , घोडेसवारी , गर्द झाडी , रानमेवा , आदिवासी महिला लाकूड घेऊन जाताना , शेतकरी बांधव शेती करताना , ” जिवा – शिवाची बैलजोडी , तर ” आम्ही कर्जतकर ” हे वाक्य प्रकाश झोतात उभे करून हे काम मुद्रे ( बु ) प्रभागात डोळ्यांचे पारणे फेडण्यासारखे असून सर्वांनीच त्याची वाहवा केली .यावेळी अनेक शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक , महिला वर्ग उपस्थित होते.