Thursday, September 28, 2023
Homeमहाराष्ट्ररायगडमुबंई पुणे एक्सप्रेवेवर पेट्रोलच्या टँकरला लागली भीषण आग, बोरघाट महामार्ग पोलिसांमुळे मोठी...

मुबंई पुणे एक्सप्रेवेवर पेट्रोलच्या टँकरला लागली भीषण आग, बोरघाट महामार्ग पोलिसांमुळे मोठी जीवितहानी टळली..

प्रतिनिधी-दत्तात्रय शेडगे

मुबंई पुणे एक्सप्रेसवेवर आज पहाटे पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलने भरलेल्या टँकरला अचानक आग लागली, या घटनेची माहिती बोरघाट पोलिसांना मिळताच तात्काळ ते घटनास्थळी दाखल होत घटनेचे गांभीर्य लक्षात घेत दोन्ही लेनची वाहतूक पुर्णपणे थांबवून तात्काळ फायरब्रिगेड यांना बोलावून आग विझवण्याचे प्रयत्न केले.
मुबंई हुन पुण्याकडे पेट्रोल घेऊन हा टँकर जात असताना तो मुबंई पुणे एक्सप्रेसवेवरील आडोशी बोगद्याजवळ आला असता त्याला अचानक आग लागून मोठी घटना घडली, या आगीत टँकरची केबिन पूर्णपणे जळून खाक झाली तर बोरघाट महामार्ग पोलिसांनी केलेल्या तात्काळ कामगिरीमुळे मोठी जीवित हानी टळली असून सगळीकडे बोरघाट पोलिसांचे कौतुक होत आहे.
- Advertisment -