मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर ऑईलच्या टँकरला लागली भीषण आग,केबिन जळून खाक, बोरघाट पोलिसांमुळे मोठा अनर्थ टळला.

0
218


खोपोली-दत्तात्रय शेडगे

मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर बोरघाटात अमृतांजन ब्रिज जवळ ऑईलच्या टँकरला सॉर्टसर्किटमुळे अचानक आग लागली या आगीत टँकरची केबिन पूर्णपणे जळून खाक झाली, मुबंई हुन पुण्याकडे ऑईल घेऊन टँकर जात असताना तो मुबंई पुणे एक्सप्रेसवेवरील बोरघाटात अमृतांजन ब्रिज जवळ आला असता त्याला अचानक आग लागली.

यात टँकरची केबिन पूर्णपणे जळून खाक झाली असून सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही, या घटनेची माहिती मिळताच बोरघाट पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहचून आग्मिशन दलाला बोलावून आग विझवल्याने बोरघाट पोलिसांमुळे मोठा अनर्थ टळला, यावेळी काही काळ एक्सप्रेसवेवरील वाहतूक थांबविण्यात आली होती.


यावेळी बोरघाट पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश परदेशी, पोलीस हवालदार, खाडे, पडळकर, म्हात्रे, साठे गर्जे, वर्तक, कडू हेमाडे यांनी विशेष मेहनत घेतली.