मुबंई पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघात…

0
293


ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने साखरेचा ट्रक पलटी, ट्रक खाली अडकून चालकाचा जागीच मृत्यू ….

प्रतिनिधी-दत्तात्रय शेडगे.

मुबंई पुणे एक्सप्रेस वेवर अपघाताची मालिका चालू असून आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास मुबंई पुणे एक्सप्रेस वेवर ढेकू गावाजवळ मुबंई लेन वर साखरेच्या ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने ट्रक रस्त्यांच्या कडेला पलटी होऊन भीषण अपघात झाला.
या अपघातात ट्रक मधील चालक याने उडी मारल्याने ट्रक त्याचा अंगावर पडून चालक त्याखाली अडकून त्याचा जागीच मृत्यू झाला.
पुण्याहून हुन मुबंई कडे साखर घेऊन जाणार ट्रक क्रमांक ( एमएच४२ टी ७७८५ ) घेऊन जात असताना ट्रक एक्सप्रेस वेवरील ढेकू गावाजवळ आला असता त्याचा ब्रेक फेल झाल्याने ट्रक पलटी झाला, चालकाने ट्रक मधून उडी मारल्याने ट्रक चालकाच्या अंगावर पडून चालकाचा चेंगरून जागीच मृत्यू झाला.
या अपघाताची माहिती मिळताच आयआरबी टीम,देवदूत यंत्रणा आणि बोरघाट पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल होत ट्रक खाली अडकलेल्या चालकास बाहेर काढण्यात मदत केली.