
ट्रेलरने पाच वाहनांना मागून धडक दिल्याने भीषण अपघात पाच जणांचा जागीच मृत्यू ,पाच जण गंभीर जखमी..
प्रतिनिधी- दत्तात्रय शेडगे.
खालापूर.मुबंई पुणे एक्सप्रेस वेवर रात्री १ वाजण्याच्या सुमारास ट्रेलरने मागून जोरदार धडक दिल्याने इनोव्हा, क्रेटा, टेम्पो अपघात झाला.ट्रेलरने मागून पाच वाहनांना जोरदार धडक दिल्याने वाहने एकमेकांवर आदळून विचित्र अपघात झाला यात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.
पुण्याहून मुबंई ही वाहने जात असताना ती मुबंई पुणे एक्सप्रेस वेवरील मुबंई लेन वर किमी फुडमोल जवळ आला असता कंटेनर ने समोरील चालणाऱ्या इनोव्हा,कार क्रेटा कार, टेम्पो आणि ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने पाच वाहनाचा विचित्र अपघात झाला.
या अपघातात या वाहनांमधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.या अपघाताची माहिती मिळताच बोरघाट पोलीस, अपघात ग्रस्त टीम चे सहकारी, देवदूत यंत्रणा तात्काळ घटनास्थळी दाखल होत वाहनांत अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यात मदत केली.