मुबंई पुणे एक्सप्रेस वेवर ट्रकने दिली बसला जोरदार धडक..

0
128

मुबंई पुणे एक्सप्रेस वेवर आज पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास ट्रक ने समोरील चालणाऱ्या बसला मागून जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला.

या अपघातात बस मधील तीन जण किरकोळ जखमी झाले आहेत.मुबंई पुणे एक्सप्रेस वेवरून पुण्याहून मुबंईकडे माल घेऊन ट्रक जात असताना तो खालापूर हद्दीत आला असता चालकाचे ट्रक वरील नियंत्रण सुटल्याने ट्रक ने समोरील चालणाऱ्या बसला जोरदार धडक दिली.

तर बसने समोरील दुसऱ्या बस ला धडक देऊन भीषण अपघात झाला,यात तीन वाहनांचा अपघात झाला असुन ट्रक मध्यभागी असलेल्या खड्यात पलटी झाला.या अपघातात बस मधील तीन जण किरकोळ जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी खोपोली येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.