Thursday, May 30, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडमुबंई पुणे एक्सप्रेस वेवर गुंडांचा थरार.. धारदार हत्यारे असलेली स्विफ्ट कार सोडून...

मुबंई पुणे एक्सप्रेस वेवर गुंडांचा थरार.. धारदार हत्यारे असलेली स्विफ्ट कार सोडून तिघे पसार…

खोपोली- दत्तात्रय शेडगे


मुबंई पुणे एक्सप्रेसने वेवरून एका स्विफ्ट कार मधून काही गुंड हे धारदार हत्यारे घेऊन पुण्याच्या दिशेने जात असताना खालापूर टोलनाक्याजवळ कोरोना परिस्थितीमुळे वाहन तपासणी करीत असताना त्यांनी एका स्विफ्ट कार ला अडविले असता.

त्या तिघांनी पोलिसांशी हुजत घालून ते तेथून पुण्याच्या दिशेने पळून गेले मात्र त्या पोलिसांनी पुढील बोरघाट महामार्ग पोलिसांना कळवून ती कार दस्तूरी जवळ पकडण्याचा प्रयत्न करीत असताना ते दस्तूरी येथील बायपास रस्त्यावर गाडी घालून ते तिघे जण गाडीतून खाली उतरून त्यांनी ती गाडी 15 ते 20 फूट खाली कोसळवली व ते तिघे जण तेथून बोरघाटातील जंगलात पसार झाले आहेत.


मात्र त्या गाडीची खोपोली पोलिसांनी तपासणी केली असता त्यात धारदार हत्यारे सापडली तेथे एकाच मोबाइल सापडला आहे आहे त्या मोबाईलच्या आधारे खोपोली पोलीस या घटनेचा खालापूर पोलीस पुढील तपास करीत आहेत.

- Advertisment -

You cannot copy content of this page