मुबंई पुणे एक्सप्रेस वेवर ट्रकने दिली कारला जोरदार धडक..तीन वाहनांचा विचित्र अपघात…

0
331

खोपोली (दत्तात्रय शेडगे)मुबंई पुणे एक्सप्रेस वेवर अपघाताची मालिका सतत सुरूच असून आज मुबंई पुणे एक्सप्रेस वेवरील आडोशी बोगद्याजवळ एका भरधाव ट्रकने उभ्या असलेल्या कारला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला या अपघातात चार जण जखमी झाले आहेत.


मुबंई पुणे एक्सप्रेस वेवरून पुण्याहून मुबंई कडे ट्रक जात असताना आडोशी बोगद्याजवळ आला असता चालकाचे ट्रक वरील नियंत्रण सुटल्याने ट्रकने रस्त्याच्या साईडला उभ्या असलेल्या कार ला जोरदार धडक दिली तर त्या कारने समोरील कार ला जोरदार धडक दिल्याने तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला.


तर या अपघातात चार जण जखमी झाले असून कार चा चक्काचूर झाला आहे या घटनेची माहिती मिळताच बोरघाट महामार्ग पोलीस, आयआरबी हे तात्काळ घटनास्थळी दाखल होते वाहनांमध्ये असलेल्याना बाहेर काढून त्यांना रुग्णालयात पाठविण्यात आले.