मुबंई पुणे एक्सप्रेस वेवर गॅसचा टँकरने दिली तीन वाहनांना जोरदार धडक..

0
371

गॅसचा टँकर एक्सप्रेस वेवर पलटी,मोठी जीवित हानी टळली.

खालापूर (दत्तात्रय शेडगे)मुबंई पुणे एक्सप्रेसवेवर अपघाताची महिला सतत सुरूच असून आज सकाली मुबंई पुणे एक्सप्रेस वेवरील खोपोली एक्झिट जवळ किमी 39 जवळ एका गॅस च्या टँकरचा ब्रेक फेल झाल्याने तीन वाहनांना जोरदार धडक देऊन गॅस चा टँकर एक्सप्रेस वेवर पलटी झाला.

मुबंई पुणे एक्सप्रेस वेवरून पुण्याहून मुबंई कडे गॅस चा टँकर जात असताना गॅस टँकरचा ब्रेक फेल झाल्याने त्याने समोरील दोन टेम्पो आणि एका कंटेनर,ला जोरदार धडक देऊन गॅसचा टँकर एक्सप्रेस वेवर पटली झाला, त्यामुळे काही काळ एक्सप्रेसवेवरील वाहतुक बंद होती तर यात एका बाईकचाही सामावेश आहे.

या घटनेची माहिती मिळताच खोपोली पोलीस, बोरघाट, पोलीस, आयआरबी, देवदूत यंत्रणा, अपघातग्रस्त मदतीच्या टीमचे सदस्य अग्निशमन दल खालापूरचे तहसिलदार इरेश चप्पलवार, डीवायएसपी संजय शुक्ला, आदी ,तात्काळ घटनास्थळी दाखल होत गॅस टँकर एक्सप्रेसवेच्या बाजूला घेण्याचे काम सुरू असून आज एक्सप्रेस वेवरील खूप मोठी दुर्घटना टळली आहे.