मुबंई पुणे एक्सप्रेस वेवर दोन विचित्र अपघात. ट्रेलरने दिली टेम्पोला जोरदार धडक..एक जागीच ठार,एक जण गंभीर..

0
288

खालापूर (दत्तात्रय शेडगे)मुबंई पुणे एक्सप्रेस वेवर आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास एका ट्रेलरने उभ्या असलेल्या टेंपोला जोरदार धडक देऊन भीषण अपघात झाला या अपघातात टेम्पो चालक ट्रेलर खाली चिरडून त्याचा जागीच मृत्यू झाला.मुबंई पुणे एक्सप्रेस वरून ट्रेलर मुबंई हुन पुण्याकडे जात असताना किमी 39 जवळ आला असता त्याचे ब्रेक फेल झाल्याने त्याने समोरील उभ्या असलेल्या टेम्पोला पाठीमागून जोरदार धडक दिली ,तर यात एकाचा जागीच मृत्यू झाला आहे.


दुसरा अपघात तर मुबंई पुणे एक्सप्रेसवेवरून ट्रक जात असताना तो अमृतांजन ब्रिज जवळ आला असता चालकाचे ट्रक वरील नियंत्रण सुटल्याने ट्रक ने अमृताजण ब्रीजच्या कठड्याला जोरदार धडक देवून भीषण अपघात झाला या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला आहेे.


मुबंई पुणे एक्सप्रेस वेवरुन पुण्याहून मुबंई कडे ट्रक जात असताना तो अमृताजण ब्रिज जवळ आला असता चालकाचे ट्रक वरिल नियंत्रण सुटल्याने ट्रक ने अमृताजन ब्रिजच्या कठड्याला जोरदार दिली तर यात चालक गंभीर जखमी झाला असुन यात ट्रकचें मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे.