मुबंई पुणे एक्सप्रेस वेवर गुळाची मळी असलेल्या टँकर पलटी .

0
56

खालापूर (दत्तात्रय शेडगे)मुबंई पुणे एक्सप्रेस वेवर सतत अपघाताची मालिका सुरू असून आज सकाळी एक्सप्रेस वेवर खोपोली एक्झिट जवळ गुळाची मळी असलेला टँकर पलटी होऊन भीषण अपघात झाला.


पुण्याहून मुबंई कडे हा टँकर जात असताना तो एक्सप्रेस वेवरील खोपोली एक्झिट जवळ आला असता त्याचा ब्रेक फेल झाल्याने तो पुणे लेन ला जाऊन पलटी झाला ,तर टँकर मधील असलेली गुळाची मळी रस्त्यावर पडली असून ती काढन्याचे काम सुरू आहे त्यामुळे काही काळ एक्सप्रेस वेवरवरील वाहतूक रोखण्यात आली होती या अपघातात टँकर चालक जखमी झाला आहेे.