कंटेनरने दिली दोन वाहनाना जोरदार धडक, एक जण गंभीर जखमी.
(खालापुर दत्तात्रय शेंडगे)
मुबंई पुणे एक्सप्रेस वेवर दुपारी एका कंटेनरने समोरील टेम्पोला जोरदार धडक देऊन भीषण अपघात झाला मुबंई पुणे एक्सप्रेस वेवर दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास पुण्याहुन मुबंई कडे माल घेऊन कंटेनर जात असताना तो फुडमोल जवळ आला असता.
चालकाचा कंटेनर वरील ताबा सुटल्याने त्याने समोरील हत्ती टेम्पो ला जोरदार धडक दिले तर हत्ती टेम्पो ने समोरील कार ला धडक देऊन तीन वाहनांचा भीषण अपघात झाला, या या अपघातात टेम्पो मधील एक जण गंभीर जखमी झाला असून टेम्पो पाच ते सहा फूट रस्त्याच्या कडेला कोसळला आहे.