मुबंई पुणे एक्सप्रेस वेवर गॅसच्या टँकरला दिली कंटेनर ने जोरदार धडक…

0
74
गॅस टँकर लिकेज ..सुदैवाने मोठी दुर्घटना टळली गॅस एक्सपर्ट मुळे अखेर गॅस लिकेज थांबली.

खोपोली (दत्तात्रय शेडगे )

मुबंई पुणे एक्सप्रेस वेवरून पुण्याहून मुबंई कडे गॅस घेऊन टँकर जात असताना तो खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत आडोशी बोगद्यातजवळ आला असता त्याला पाठीमागून येणाऱ्या कंटेनरने जोरदार धडक दिली.

यात टँकर मधील गॅस गळती झाल्याने घटना घडली याची माहिती खोपोली पोलीस, बोरघाट पोलीस आणि अपघात ग्रस्त टीमच्या सदस्यांना मिळताच ते तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व गॅस एक्सपर्ट यांना बोलावून गॅस गळती पूर्णतः बंद करण्यात आली असून परिस्थिती नियंत्रणात आणली या अपघातात मोठी जीवित हानी होता होता वाचली मात्र काही काळ वाहतूक बंद करण्यात आली होती.