मुबंई पुणे एक्सप्रेस वेवर टेम्पोला भीषण आग, एकाचा होरपळून मृत्यू…

0
29

खालापूर (दत्तात्रय शेडगे)
मुबंई पुणे एक्सप्रेसवेवर वारंवार भीषण अपघात होत असतात,त्याचप्रमाणे रात्री मुबंई पुणे एक्सप्रेसवेवर पुणे लेनवर एका आयसर टेम्पो ला भीषण आग लागली या आगीत एक जण होरपळून मृत्यू झाला.

मुबंई पुणे एक्सप्रेस वेवरून पुण्याकडे हा टेम्पो जात असताना तो रसायनी पोलीस ठाण्यात हद्दीत आला असता त्याला अचानक आग लागली या आगीत एकाचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.या अपघाताची माहिती मिळताच ,रसायनी पोलीस, पलस्पे पोलीस,लोकमान्य हॉस्पिटलची टीम, अपघात ग्रस्त टीमचे सदस्य ,आयआरबी टीम, फायर ब्रिगेड ची गाडी तात्काळ घटनास्थळी दाखल होत आग विझवण्याचे शर्थीने प्रयत्न केले, मात्र या आगीत इलेट्रिक वायर, सौंदर्य प्रसाधने इत्यादी साहित्यमोठ्या प्रमाणात असल्याने ती भडकली.