मुबंई पुणे एक्सप्रेस वेवर विचित्र अपघात,पाच वाहनांचा झाला भीषण अपघात..दोन जण जागीच ठार..

0
390

खालापूर:मुबंई पुणे एक्सप्रेस वेवर अपघाताची मालिका सतत सुरूच असून आजही पहाटे अफकोन कंपनी जवळ एका ट्रेलरने समोरील चार वाहनांना जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला या अपघातात तीन जण जागीच ठार झाले.


मुबंई पुणे एक्सप्रेस वेवर पुणे लेनवर मुबंई हुन पुण्याकडे एक ट्रेलर भरधाव वेगात जात असताना तो (किमी 39) अफकोन कंपनी जवळ आला असता चालकाचे त्यावरील नियंत्रण सुटल्याने त्याने समोरील पटेल ट्रॅव्हलस, वैभव ट्रॅव्हल आयसर टेम्पो, हुंडाई कार,टाटा टेम्पो, यांना जोरदार ठोकर दिल्याने भीषण अपघात झाला.


या अपघातात आयसर टेम्पो मधील 1 जण तर हुंडाई कार मधील दोन जण जागीच ठार झाले आहेत, तर एक जण जखमी आहे, हा अपघात एवढा भीषण होता का एक्सप्रेस वेवरील वाहतूक काही काळ बंद ठेवण्यात आली होती.


या अपघाताची माहिती मिळताच खोपोली पोलीस, बोरघाट पोलीस, देवदूत यंत्रणा अपघात ग्रस्तटीमचे सदस्य, डेल्टा फोर्स आयआरबी पेट्रोलिंग तात्काळ घटनास्थळी दाखल होत गाड्यामध्ये अडकलेल्याना बाहेर काढण्यात मदत केली.