Thursday, June 1, 2023
Homeपुणेमुबंई पुणे एक्सप्रेस वेवर वाहतूक कोंडी ,तीन ते चार किमी पर्यंत वाहनांच्या...

मुबंई पुणे एक्सप्रेस वेवर वाहतूक कोंडी ,तीन ते चार किमी पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा..

खालापूर (दत्तात्रय शेडगे)
मुबंई पुणे एक्सप्रेस वेवर आज सकाळ पासून मोठया प्रमाणात वाहतूक कोंडी झाली असून अमृतांजन ब्रिज ते दत्तवाडी पर्यंत वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

दिवाळीच्या सुट्या आल्याने कामगार व पर्यटक हे लोणावला खंडाळा या ठिकाणी फिरायला मोठ्या प्रमाणात येत असल्याने आज सकाळ पासून पुणे लेन वर एक्सप्रेस वेवरील अमृताजण ब्रिज पासून तीन ते चार किमी पर्यंत वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत, याचा फटका प्रवाशी वाहन चालक आणि पर्यटकाना बसला आहे.

You cannot copy content of this page