मुबंई पुणे एक्सप्रेस वेवर बस चा अपघात, बस ने दिली ट्रक ला जोरदार धडक..

0
61


खोपोली-दत्तात्रय शेडगे.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर किलोमीटर 37 पुण्याहुन मुंबई कडे जाणारी ऑरेंज ट्रॅव्हल्स या खाजगी बस ने पुढे जाणाऱ्या एका मालवाहु ट्रकला मागून जोर दार धडक दिल्याने हा अपघात झाला आहे भरधाव बसवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाला आहे.

अपघातात बस चालक तसेच अन्य एक जण गंभीर झाला असून इतर सात ते आठ जण किरकोळ जखमी झाले आहेत सर्वांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अपघाताची माहिती मिळताच बोरघाट वाहतूक पोलीस त्याचप्रमाणे आय आर बी पेट्रोलिंग देवदूत यंत्रणा यांनी तात्काळ मदत कार्य करण परिस्थिती आटोक्यात आणलीअपघातग्रस्त बस महामार्गावरून बाजूला केल्याने मुंबईकडे जाणारी वाहतूक सध्या सुरळीत झाली आहे.