मुबंई पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात,बस ने दिली ट्रकला जोरदार धडक 10 प्रवाशी जखमी.

0
185


खोपोली- दत्तात्रय शेडगे

मुबंई पुणे एक्सप्रेस वेवर अपघाताची मालिका सुरू असून आज पहाटे एका खाजगी बसचा ब्रेक फेल झाल्याने बस ने समोरोल ट्रक ला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला या अपघातात बस मधील 10 प्रवासी किरकोळ जखमी झाले असून बस मध्ये 49 प्रवाशी प्रवास करत होते.

मुबंई पुणे एक्सप्रेस वेवरून भरधाव वेगात मुबंई कडे ही बस जात असताना ती किमी 37 जवळ आली असता तिचा ब्रेक फेल होऊन चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने बसने समोरील ट्रक ला जोरदार धडक दिली, या अपघातात बस मधील 10 प्रवासी जखमी झाले असून त्यांना तात्काळ पुढील उपचारासाठी पवना हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले.

मात्र या अपघातात कोणितीही जीवित हानी झाली नाही या अपघाताची माहिती मिळताच बोरघाट पोलीस, आयआरबी पेट्रोलिग, अपघात ग्रस्त टीमचे सदस्य हे तात्काळ घटनास्थळी दाखल होत बस मधील अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढुन त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात पाठवुन दिले.