प्रतिनिधी-दत्तात्रय शेडगे.
मुबंई पुणे एक्सप्रेस वेवर रात्रीच्या सुमारास सॉर्टसर्किट मुळे कार ला भीषण आग लागून कार जळुन खाक झाल्याची घटना घडली.
मुबंई पुणे एक्सप्रेस वेवर मुबंई हुन पुण्याकडे (एमएच ०२बीजे १०१० )या क्रमांकाची स्विफ्ट कार जात असताना ती खालापूर हद्दीत आली असता तिला अचानक आग लागून आगीत कार पूर्णपणे जळुन खाक झाल्याची घटना घडली, मात्र सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही.
या घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस, आयआरबी पेट्रोलिंग, डेल्टा फोर्स, आणि देवदूत यंत्रणा तात्काळ घटनास्थळी दाखल होत आग विझवण्याची शर्थीने प्रयत्न केले
गेल्या २४ तासातील ही दुसरी घटना असुन काल एक्सप्रेस वेवर ट्रेलरच्या केबीन ला भीषण आग लागुन केबिन जळून खाक झाली होती, मात्र आता पुन्हा कार ला आग लागल्याने वाहतूक चालकांनी चिंता व्यक्त केली आहे.