मुबंई पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात,कंटेनर ४० फूट दरीत कोसळला.

0
373


खोपोली- दत्तात्रय शेडगे

मुबंई पुणे एक्सप्रेसवेवर ढेकू गावाजवळ एक्सप्रेस वेवरून कंटेनर ४० फूट दरीत कोसळून अपघात झाला या अपघातात चालक किरकोळ जखमी झाला आहे.
मुबंई पुणे एक्सप्रेसवेवरून पुण्याहून मुबंई कडे ( कंटेनर क्रमांक एचआर ५५एइ ५११८ )जात असताना तो ढेकू गावाजवळ आला असता चालकाचे त्यावरील नियंत्रण सुटल्याने तो ४० फूट रस्त्याच्या असलेल्या दरीत कोसळला, या अपघातात कंटेनरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून कंटेनर चालक किरकोळ जखमी झाला असून त्याला तात्काळ पुढील उपचारासाठी खोपोली नगरपालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले.