मुबंई पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात…

0
250


ट्रक ने दिली कारला पाठीमागून जोरदार धडक तीन जण गंभीर जखमी..

खोपोली- दत्तात्रय शेडगे

मुबंई पुणे एक्सप्रेस वेवर अपघाताची मालिका सतत सुरू असून आज सायंकाली मुबंई पुणे एक्सप्रेस वेवर फुडमोलजवळ ट्रक चालकाचे ट्रक वरील नियंत्रण सुटल्याने ट्रकने समोरील कार ला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला या अपघातात कार मधील तीन जण गंभीर जखमी झाले असून कारचा चक्काचूर झाला आहे.

मुबंई पुणे एक्सप्रेस वेवर मुबंई हुन पुण्याकडे माल घेऊन जाणाऱ्या ट्रक क्रमांक (केए २५ सी ७३४९ ) चालकाचे ट्रक वरील नियंत्रण सुटल्याने ट्रक ने समोरील कार ला जोरदार धडक देऊन भीषण अपघात झाला या अपघात कार मधील तीन जण गंभीर जखमी झाले असून तात्काळ त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले.

तर ट्रक हा एक्सप्रेसवेवरील रोलिंग मध्ये अडकला होता.या अपघाताची माहिती मिळताच बोरघाट पोलीस ,देवदूत यंत्रणा अपघात ग्रस्त टीमचे सदस्य तात्काळ घटनास्थळी दाखल होत कार मध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यात मदत केली.